Ad will apear here
Next
वन डिश मिल
एकट्याने राहण्याची कधी वेळ आली, तर जेवणाचे काय करायचे हा प्रश्न असतो. कधी कधी स्वयंपाक येत नसतो, तर कधी करायचा कंटाळा आला असतो किंवा कधी करायचे काय, असाही प्रश्न येतो. अशा वेळी कविता महाजन यांचे हे पुस्तक मदत करू शकते. पुस्तकाच्या प्रारंभी त्यांनी स्वयंपाकघरातली उपकरणे व भांड्यांची माहिती आणि स्वयंपाकाची पूर्वतयारी कशी करावी, याचे मार्गदर्शन केले आहे.

ओल्या-सुक्या चटण्या आणि लोणची हा खास विभाग पुस्तकात आहे. त्यानंतर उन्हाळा, हिवाळा आणि पावसाळा असे तीन विभाग केले आहेत. पाककृती देताना प्रथम एक प्रमुख पदार्थ आणि त्याच्या बरोबरीला दुसरा पदार्थ अशी रचना केली आहे. उदा. कडधान्यांची खिचडी आणि त्याबरोबर आमसुलाचे सार किंवा चिंचेच भात आणि बरोबर राव्याची लापशी. या विभागांमधून फळे, फळभाज्या, भाजीपाला, कडधान्यांपासून तयार करता येतील, असे पदार्थ शिकायला मिळतात.

प्रकाशक : इंद्रायणी साहित्य प्रकाशन
पाने : ११२
किंमत : १२५ रुपये
      
(हे पुस्तक ‘बुकगंगा डॉट कॉम’वरून घरपोच मागवण्यासाठी खालील लिंकवर क्लिक करा.)


 
Feel free to share this article: https://www.bytesofindia.com/P/ZZYZBN
Similar Posts
लीलावती भागवत, कविता महाजन बालकुमार साहित्यात मोलाची भर टाकणाऱ्या लीलावती भागवत, सामाजिक विषमता आणि स्त्रियांच्या प्रश्नांना वाचा फोडणाऱ्या कविता महाजन, ज्ञानेश्वरीचे अभ्यासक भालचंद्र बहिरट, गोव्याविषयी विशेष संशोधन करणारे अनंत प्रियोळकर आणि ‘गावगाडा’कार त्रिंबक आत्रे या साहित्यिकांचा पाच सप्टेंबर हा जन्मदिवस. त्यानिमित्त आज ‘दिनमणी’मध्ये या सर्वांचा अल्पपरिचय
अन्यायाविरोधात आवाज उठविणारी संवेदनशील ‘कविता’ आपल्या साहित्यातून चाकोरीबाहेरचे विषय मांडणाऱ्या लेखिका कविता महाजन यांचे २७ सप्टेंबर २०१८ रोजी पुण्यात निधन झाले. अन्यायाविरोधात आवाज उठविणाऱ्या बंडखोर, पण तितक्याच संवेदनशील लेखिका आणि चित्रकार असे त्यांचे वर्णन करता येईल. स्त्रियांचे प्रश्न त्यांनी लेखनातून मांडले; पण तरीही स्त्रीवादी लेखिका असा शिक्का त्यांच्यावर बसला नाही
हृषीकेश मुखर्जी आनंद, गुड्डी, चुपके चुपके, अभिमान असे चित्रपट आठवले की हृषीकेश मुखर्जी यांचे नाव येते. हृषीदांचे चित्रपट व त्याचे रसग्रहण असे स्वरूप असलेले ‘हृषीकेश मुखर्जी’ हे पुस्तक जय अर्जुन सिंग यांनी लिहिले आहे.
घार हिंडते आकाशी एखाद्या बाईला तिळे झाले, तर ‘कसे सांभाळता हो तुम्ही,’ असा प्रश्न अनेकांच्या तोंडी येतो. याचा सामना करीतच शेफाली वैद्य यांनी अनन्या, अर्जुन आणि आदित्य या त्रिमूर्तींच्या पालनपोषणाची जबाबदारी स्वीकारली. या तिळ्यांच्या जन्मापासूनची जडणघडण त्यांनी ‘घर हिंडते आकाशी’मधून शब्दबद्ध केली आहे.

Is something wrong?
ठिकाण निवडा
किंवा

Select Feeds (Section / Topic / City / Area / Author etc.)
+
ही लिंक शेअर करा
व्यक्ती आणि वल्ली स्त्री-शक्ती कलाकारी दिनमणी
Select Language